| |

पूजा चव्हाण प्रकरणात पहिले पोलिसांवर कारवाई व्हावी

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भक्कम पुरावे असताना पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. या प्रकरणात पहिल्यांदा पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसेच प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचे सांगत माध्यमाने हे प्रकरण जर दाखविले नसते तर दाबून टाकण्यात आले असते. असेही यावेळी ते म्हणाले. या प्रकरणावर गृहमंत्री गप्प का आहेत? सीडीतील आवाज कोणाचा आहे हे अजून सांगू शकले नाहीत. हे सर्व सरकारच्या आशिर्वादाने सुरु आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कोणाचीही नाराजी नाही. नाराजी असती तर आता पर्यंत राजीमाना घेण्यात आला असता, असेही फडणवीस म्हणाले.

अधिवेशन पूर्ण वेळ घेण्यात यावे. राज्यभर वीज तोडणी सुरु आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते मांडायचे कुठे. राज्य सरकार कामकाज रेटून नेण्याच्या तयारीत आहेत. कामकाजापासून पळ काढण्यासाठी लहान अधिवेशन घेण्यात येत आहे. याला विरोध म्हणून आम्ही कामगार सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अधिवेशनाला कोरोनाचे कारण सांगत कालावधी कमी करत आहेत. मात्र, राज्य सरकार मधील मंत्री १० हजार नागरिक जमवत आहेत. पक्षाचे कार्यक्रम, संमेलन होत आहे. जनतेच्या विषयावर बोलताना सत्ताधारी कोरोना-कोरोना करत आहेत. कोरोनाच्या नावाखाली पळ काढत आहेत. २ दिवसात अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकत नाही. विविध प्रश्नावर विरोधक आक्रमक राहील त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.  

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आपल्याच आमदार, मंत्र्याला घाबरले आहेत. त्यामुळे हा विषय अजेंडावर घेण्यात आला नाही. कुठलाही कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन न घेण्याचे सरकारचे धोरण आहे. अधिवेशन घेण्यापासून भीत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *