अखेर अनिल देशमुखांच्या चौकशीची तारीख ठरली

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात येणार आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स पाठविले आहे. १४ एप्रिल रोजी त्यांची चोकशी होणार आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांची चौकशी झाली आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या एसीपी संजय पाटील यांची सीबीआयकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्याविरोधात अनिल देशमुख सर्वोच्य न्यायलयात गेले होते. मात्र, त्यांना तेथे कुठलाही दिलासा मिळाला नाही. आरोप गंभीर असम चौकशीला समोर जा असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलं होता.
१४ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. त्यातून काय बाहेर येते हे पाहावे लागणार आहे.