मला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात अडकवू नका: वनमंत्री संजय राठोड
यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड हे गेल्या काही दिवसांपासून संशयित होते. मात्र आज त्यांनी तब्बल १५ दिवसाननंतर मौन सोडले आहे. प्रसंगी त्यांच्यावर केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्या विरोधात अत्यंत घानेरड राजकारण करण्यात येत आहेत. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
मी १५ दिवस गायब नसून १० दिवस मी शासकीय कामात व्यस्थ होतो. कृपा करून माझ्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी थांबवा, असे आवाहन त्यांनी केले. पूजा चव्हाणच्या मृत्यूच मला ही दुख आहे. समाज माध्यमातून माझी बदनामी होत आहे. चौकशीतून सत्य समोर येईल, त्यामुळे मला उगाच गुन्हेगाररीच्या पिंजऱ्यात अडकवू नका, असेही ते म्हणाले.