‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं चित्रीकरण थांबलं!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: बहुचर्चित गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या दरम्यान चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांचा सेटवर वाढदिवस साजरा करण्यात आला.  यावेळी अभिनेता रणबीर सुद्धा उपस्थित होता. भन्साळी आणि रणबीर कपूर या दोघानाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. संजय लीला भन्साळी हे क्वारंटाईन झाले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.

भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं चित्रीकरण फास्ट मोडवर सुरु होतं. पण आता चित्रपट निर्मात्याला कोरोना झाल्याने या चित्रीकरणाला देखील ब्रेक लागला आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ३० जुलैला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाले होते. ज्यात आलियाच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र हा चित्रपट दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध ते महाराष्ट्र विधानसभेतूनही या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरत आहे. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणावरच कोरोनाचं संकट आलंय. कारण आता निर्मात्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, या चित्रपटाशी संबंधित इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.  

संजयलीला भन्साळी यांचा हा चित्रपट हुसैन जैदी यांचं ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात गंगूबाई काठियावाडी यांची जीवन कथा मांडण्यात आली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *