देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वरून राजकारण तापले आहे. आता याला आणखी धारचढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यास धमकाविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात दोघांना अटक झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली आहे. याबाबत भाजप काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.
आमदार अतुल भातखळकर यांची नवाब मलिक विरोधात तक्रार
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन वरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरविणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर तक्रार दिली आहे.