|

ब्रूक फार्मा सह भाजपा नेत्यांवर खटले भरा – कॉंग्रेस

File lawsuits against BJP leaders with Brooke Pharma - Congress
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : रेमडेसीवीर इंजेक्शना वरून सत्ताधारी विरोध यांच्यात एकमेकांवर आरोप करत आहे. यावादात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्माचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
काय म्हणाले कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
“इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगी रित्या कशी वाटली? असा सवाल उपस्थित केला.


ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तीला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी दरेकर व लाड यांच्या बरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक असल्याचे सांगत डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *