|

रश्मी शुक्ला यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

File a case of culpable homicide against Rashmi Shukla
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. रश्मी शुक्लावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी निलंबित पोलीस शिपाई दिनेश राठोड यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.

            रश्मी शुक्ला या पुण्यात पोलीस आयुक्त असतांना ठाण्याच्या अंजली कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई दाम्पत्य राठोड यांना निलंबित केल होत. एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे प्रमाणपत्र असतांना सुद्धा निलंबनाची कारवाई केली असल्याचा दावा दिनेश राठोड यांनी केला आहे.

            दिनेश राठोड यांना एक दिवसात घर खाली करायला लावले होते. त्यावेळी राठोड दाम्पत्याच्या लहान बाळाचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांनी अनेक गैरकृत्य केले आहेत. रश्मी शुक्ला दोषी आहेत, खुनी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. शुक्ला यांच्याबरोबर निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. धुमाळ हे एटीएसचे पोलीस आहे. त्यावेळी त्यांनी खंडणी मागितली होती. या दोघांवर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

            रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त असतांना धुमाळ यांच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचा काम करायच्या, असा आरोप सुद्धा हरिभाऊ राठोड यांनी लगावला. धुमाळ २०१६ मध्ये एटीएस मध्ये कार्यरत असतांना रश्मी शुक्ला यांच्यासाठी खंडणी वसूल करायचा असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

२०१६ मध्ये पुण्यात एक बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव यांना यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी जाधव यांनी व्हिडिओ क्लीप काढत धुमाळ यांनी खंडणी मागितल्याचे सांगितले होते. त्यावेळी, तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कारवाई केली नव्हती.    


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *