चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी एका जुन्या प्रकरणात भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भुमिका घेतल्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर सूड उगवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असल्याची भाजप कडून सांगण्यात येत आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १२ फेब्रुवारीला लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ आक्रमक झाल्याने त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. किशोर वाघ यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत याबाबत म्हणाले, भाजप सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. सूड घेण्याचा प्रयत्न नसल्याचे सावंत यांनी सांगितले.
यानंतर चित्रा वाघ नेमकी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.