|

समाधान आवताडे विरुद्ध भगीरथ भालके! पंढरपूर-मंगळवेढ्यात तगडी लढत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे दिवगंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

पोटनिवडणूकित भाजपने याच मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढताना प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर देणारे समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं. या सगळ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान भाजपचा उमेदवार जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याही उमेदवाराची घोषणा केली आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतभगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी घोषित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्याचे  ट्वीट करून सांगितले. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहे. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा !’ असं म्हणत त्यांनी भगीरथ भालकेंना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

समाधान महादेव आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उद्या (मंगळवार ३० मार्च) उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक असल्यानं सत्ताधारी व विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे समाधान आवताडे विरुद्ध भगीरथ भालके अशी तगडी लढत पहायला मिळणार आहे.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *