सर्वोच्य न्यायालयातील पन्नास टक्के कर्मचारी कोरोना बाधित

दिल्ली: देशभर कोरोनाने थैमान घातला आहे. काही राज्यात बिकट परिस्थिती असून बेड न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वोच्य न्यायालयाला सुद्धा याचा फटका बसला आहे. सर्वोच्य न्यायालातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एनआयने सुत्राच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित आढळून आल्याने सर्वोच्य न्यायालयातील घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्य न्यायालयाचा परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. अनेक खंडपीठ एक तास उशिराने सुनावणी घेणार आहे.
कर्मचारी बाधित झाल्याने सुनावणीवर परिणाम झाला आहे. सकाळी साडे दहा वाजता सुरु होणारी सुनावणी १ तास उशिरा सुरु झाली. अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली. याबाबत काही न्यायाधीशांनी न्यायालातील कर्मचारी बाधित असल्याचे सांगितले. काही न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते आता बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काल देशभरात २४ तासात १ लाख ६८ हजार ९१२ कोरोना बाधित आढळून आले आहे. यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Many staff members of the Supreme Court are believed to be infected with #COVID19 hence SC judges today will conduct hearings, from their respective residences: Supreme Court sources pic.twitter.com/ZDt4F3VPcu
— ANI (@ANI) April 12, 2021