वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून ‘या’ महिला अधिकारीने केली आत्महत्या
अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दिपाली चव्हाण असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती येथे घडली आहे.
दिपाली यांनी सूसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ४ पानाच्या सूसाइड नोट मध्ये वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या दिपाली चव्हाण मूळच्या मराठवाड्यातील रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या ५ वर्षापासून त्या कार्यरत आहे. एक तडफदार अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. दोन वर्षापूर्वी राजेश मोहिते यांच्या सोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. मोहिते अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दिपाली यांच्या निवासस्थानावरून गोडी झाडल्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक, वनकर्मचारी, अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी दिपाली चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
काय आरोप केलेत DFO विनोद शिवकुमार यांच्यावर
DFO विनोद शिवकुमार यांनी पहिले काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवसानंतर आजूबाजूच्या कर्मचाऱ्यानी कान भरायला सुरुवात केल्या नंतर तुला नोटीस काढतो, तुझ्या विरोधात चार्जशीट करतो अशी धमकी देऊ लागले. वारंवार निलंबित करण्याची धमकी देऊ लागले. काही गावांचे पुर्नवसन होत आहे. त्या गावातील नागरिक भेटायला आल्यावर त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. मी एकटी राहत होते. त्यांनी त्याचा फायदा घेतला. कर्मचाऱ्यांना घाण-घाण शिव्या देतात. माझ्या आत्महत्येला विनोद शिवकुमार जबाबदार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.