प्रसिद्ध पटकथाकार जावेद अख्तर साजरा करतायत ७८वा वाढदिवस!!!

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कवी, पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा आज ७८वा वाढदिवस आहे. जावेद अख्तरांचा साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२००७) आणि साहित्य अकादमी पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केले आहे. जावेद अख्तर यांच्या नावे तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कार आहेत.
भारतीय सिनेसृष्टीतील पटकथा लेखकांची प्रसिद्ध जोडी म्हणून “सलीम-जावेद” यांच्या जोडीला ओळखले जाते. या दोन्ही लेखकांनी आपल्या लेखणीच्या जोरावर भारतीय सिनेमा जगात अनेक हिट सिनेमे दिले. बॉलिवूडच्या काका म्हणून ओळख असणाऱ्या आणि त्यावेळेसचे सुपरस्टार राजेश खन्ना यांनी सलीम-जावेद या जोडीला ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपट लेखनाची संधी दिली होती. पूर्वीच्या काळात पटकथा लेखकांना लेखनासाठी क्रेडिट्स दिले जात नव्हते या प्रथेलादेखील राजेश खन्नाने मोडीत काढले.
“सलीम-जावेदची” सुरुवात झाली तरी कुठून?
जावेद अख्तर आणि सलीम खानच्या मैत्रीची सुरुवात झाली होती सरहद्दी लुटेरा या चित्रपटासोबत. सरहदी लूटेरा या चित्रपटामध्ये सलीम एक छोटी भूमिका करत होते आणि जावेद अख्तर याच सिनेमामध्ये क्लॅपर बॉय होते.
दिग्दर्शक एस.एम.सागर आपल्या चित्रपटासाठी संवाद लेखक शोधण्यास असक्षम ठरले आणि त्यांनी जावेद अख्तरांची निवड संवाद लेखक म्हणून केली. तिथून सलीम आणि जावेद अख्तरांच्या मैत्रीची सुरुवात झाली. सलीम खान, लेखक-दिग्दर्शक अबरार अल्वीला मदत करायचे आणि जावेद अख्तर कैफी आझमीला मदत करायचे. आणि त्यांच्या मैत्रीच रूपांतर झाले एका सुप्रसिद्ध लेखकानंच्या ‘सलीम-जावेद’ या जोडी मध्ये.
सलीम-जावेद ने एकत्र काम करायला सुरुवात केली, अधिकार आणि अंदाज या चित्रपटासोबत. आणि त्यानंतर या जोडीचा प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे. १९८० च्या काळात प्रसिद्धी प्राप्त केलेल्या या जोडीने अनेक चित्रपटात सोबत काम केले. अधिकार (१९७१),अंजाम (१९७१), यादों की बारात (१९७३), जंजीर (१९७३), हाथी मेरे साथी आणि सीता और गीता (१९७२) , हाथ की सफाई (१९७४), दीवार (१९७५), शोले (१९७५), चाचा भटिजा (९९७७) डॉन, (१९७८), त्रिशूल (१९७८) असे हिट सिनेमे ही केले होते. दोस्ताना (1980), क्रांती (1981), जमाना (1985) आणि मिस्टर इंडिया (1987). प्रेमदा कनिके आणि राजा नन्ना राजा या दोन कन्नड चित्रपटांसह त्यांनी 24 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
का तुटली ही जोडी?
जावेद अख्तरांनी वेगळे व्हायचे असे सलीम खानला सांगितले होते. हे ऐकून सलीम खान यांना धक्का बसला होता. वेगळे होण्याबाबतच्या प्रश्नावर “प्रत्येक डब्ब्यावर एक्सपायरी लिहिलेली असते, कदाचित या नात्याची तारीखही लिहिली असेल. माझ्यावर विश्वास ठेवा, वेगळं व्हावं, ही जावेद यांची कल्पना होती. आजही पती-पत्नी, जोडीदार वेगळे होतात. प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं,” असे म्हटले होते. सलीम-जावेद ही जोडी १९८२ मध्ये वेगळी झाली होती.
वेगळे झाल्यानंतर, जावेद अख्तरांनी पटकथा लेखक म्हणून बेताब (१९८३), दुनिया (१९८४), मशाल (१९८४), अर्जुन (१९८५), मेरी जंग ( १९८५) सारखे बरेच चित्रपटांवर काम केले. या बरोबरच जावेद अख्तरांनी आपला मुलगा फरहानसोबत दिल चाहता है, लक्ष्य, रॉक ऑन!! आणि मुलगी झोयासोबत जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये काम केले आहे.
जावेद अख्तर स्वतःच्या कामामुळे तर चर्चेत होतेच पण त्यांच्या टिप्पण्यांनी देखील चर्चेत होते. आर.एस.एस आणि तालिबान ची तुलना असो, टुकडे़-टुकड़े गॅंगसोबत जोडले गेलेले नाव किंवा बुरखा बॅनवर मतमांडणी असो. या सर्व मुद्द्यांवर रोखठोक विधानामुळे वादांच्या कचाट्यात सापडले होते.
मागच्या वर्षी “अँग्री यंग मॅन” नावाची डॉक्युमेंट्रीची घोषणा करण्यात आली होती. ही डॉक्युमेंट्री पटकथा लेखक सलीम-जावेद यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. सलमान खानची निर्मिती संस्था, एस के एफ (सलमान खान फिल्म्स) फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि झोया अख्तरचे टायगर बेबी फिल्म्स कोलॅब्रेशन करणार आहेत.
जावेद अख्तरांनी तरकश, जादूनामा, इन अदर वर्ड्स, टॉकिंग सॉंग्स, टॉकिंग फिल्म्स हे पुस्तके लिहिले आहेत. जावेद अख्तर यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहेत. “जिधर जाते है सब जाना उधर अच्छा नही लगता”, “बहाना धुंडते रहते है कोई रोने को”, “याद उसे भी एक अधुरा फसाना होगा” सारख्या कविता देखील लिहिल्या आहेत. मिली चित्रपटात जावेद अख्तरांनी गीतकार म्हणून काम केले आहे. अश्या दिग्गज कलाकाराला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा