दूरदर्शनच्या प्रसिद्ध न्यूज अँकर कनुप्रिया यांचं कोरोनानं निधन

नवी दिल्ली : काल प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाला असता आज आणखी एका प्रसिद्ध न्यूज अँकरचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुरदर्शनच्या न्यूज अॅंकर कनुप्रिया यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फेसबुक या सोशल माध्यमातून दिली होती. मात्र आज त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मीडिया क्षेत्राच्या दु:खाच आणखी भर पडली असून सर्वीकडून शोक व्यक्त केला जात आहे.
कनुप्रिया ह्या दुरदर्शच्या प्रसिद्ध न्यूज अँकर असून त्या उत्तम अभिनेत्रीही होत्या. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती त्यांनी दोन दिवसापुर्वी फेसबुक या सोशल माध्यमातून दिली होती. दरम्यान यामध्ये त्यांनी कोरोनाची लागण झाली असून रुग्णालात उपचार घेत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचेही म्हटले होते. मात्र त्यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कनुप्रिया यांची उपचारादरम्यान ऑक्सिजनची पातळी कमी झाली असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.