‘निर्बंधातून सामान्यांना दिलासा द्या’ फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संमतीनेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आल्याचे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले होते.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. अस ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
नेमकी पत्रात काय केली मागणी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे कठोर निर्बंध लागतील. असा आपला दूरध्वनी आला. दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रमाणे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लॉक रस्त्यावर येऊन याचा विरोध करत आहे.
हे निर्बंध लावताना इतर क्षेत्राचा अजिबात विचार करण्यात आला नाही. अनेक क्षेत्रांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. अर्थव्यस्थेलाही त्यामुळे चांगलाच फटका बसत आहे. ज्या प्रकारे निर्बंध लावण्यात आले आहे ते पाहता एक प्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे हॉटेल, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे.