Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाफडणवीस त्यांच्या कार्यकाळात स्वतः न्यायाधीश होते

फडणवीस त्यांच्या कार्यकाळात स्वतः न्यायाधीश होते

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विरोधक गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर आडून बसले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनातील बदल्या बाबत सरकारवर दबाव आणला आहे. अशाच फोन टॅपिंग प्रकरणी भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. यात हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.कॉंग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असून कॉंग्रेसने आपला हिस्सा किती हे सांगावे असा टोला लगावला होता. याला उत्तर देतांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाटा आणि घाटा फडणवीसांच्या काळात जनतेने पहिला असल्याचे टिका पटोले यांनी केली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, फडणवीस यांच्या कार्यकाळात किती वाटा आणि घाटा झाला हे जनतेने पाहिले आहे. आरएसएसला कशा प्रकारे वाटा पोहचविण्यात आला हे पाहिले आहे. आरएसएस लोक कशी प्रत्येक मंत्रालयात होती. त्यांच्या खात्यात किती आरएसएस लोक होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर आरोप करत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

फडणवीस त्यांच्या कार्यकाळात स्वतः न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर ते क्लीन चीट देत होते. त्यावेळी त्यांनी राजीनामे का घेतले नाही. राजकारणात आरोप होत असतात. मात्र, जो पर्यंत सत्यता येईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. दोषीवर कारवाई व्हावी ही भूमिका कॉंग्रेसची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments