”फडणवीसांनी पत्र पाहावं” ; भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचं ‘ते’ पत्र दाखवलं

राहुल गांधी
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. सावरकरप्रेमी मंडळी आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

भाजपकडून राहुल गांधींचा समाचार घेतला जातोय. तर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकरांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये.

या सर्व घडामोडी सुरु असताना राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत सावरकरांनी इंग्रजांना लिहिलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच राहुल गांधींना सावकारांबद्दल माहिती नसल्याची टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर राहुल गांधींनी पलटवार केला.

“सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत आहे. ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असं सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीसांनी हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती,” असं राहुल गांधी म्हणाले.

ते म्हणाले की, ‘गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला’.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *