तन्मयच्या लसीकरणावरून फडणवीसांनी हात झटकले, अमृता फडणवीस म्हणाल्या…

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांच्या लसीकरणावरून वाद-विवाद सुरु आहेत. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय दुरचा नातेवाईक आहे म्हणत हात झटकले आहेत. तर तन्मयच्या काकू अमृता फडणवीस यांनी भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी पावलं उचला असे सांगितले आहे.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मयने काल नागपूर मधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर निकषात न बसता लस घेतल्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ अस म्हणत ताशेरे ओढले होते. त्याला अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.
Priority for any service should be on basis of decorum or prevalent policy. No one is above rules & law. The law can take its course and we stand for justice always ! We are with you on this issue, pls take action which will stop future queue breaking occurrences!#tanmayfadnavis https://t.co/SgLYOAMGee
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 20, 2021
काय म्हणाल्या अमृता फडणवीस
“कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करू शकतो आणि नेहमीच न्यायासाठी उभे आहोत! आम्ही या विषयावर आल्या सोबत आहोत. कृपया रंग तोडण्याचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य कृती करा!” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
४५ वर्ष पुर्ण नसतांना तन्मय फडणवीस यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तन्मय हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू होय.