सह्याद्री पेक्षा फडणवीस मोठे, म्हणूनच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाही
दिल्ली: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. फडणवीस हे खूप मोठे नेते आहे. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्या पेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळे फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही, असा खोचक टोला राऊत यांनी लावला.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल असे वर्तन करू नये. राज्य सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करून विरोधी पक्षाच हस करत आहेत अशीही टिका राऊत यांनी केली.
राऊत यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंह यांच्या पत्रात संशय घेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. इतर कोणी पत्र लिहून दिले आणि परमबीर सिंह यांनी त्यावर फक्त सही केली का, असा संशय राऊत यांनी बोलून दाखवला.
याप्रकरणात अनिल देशमुख आणि राज्य सरकार पहिल्या दिवशी पासून चौकशी करा अशी मागणी करत आहेत. चौकशीला कोनोही नकार दिला नाही. फक्त राज्याचे विरोधी पक्ष नेते याला विरोध करत आहे. आधी चौकशी नव्हे तर आधी फाशी द्या अस त्याचं म्हणन आहे. फडणवीस यांच्या राजवटीत किती नेत्यांना फाशी दिली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आता या प्रकरणात फार काही घडणार नाही, याची फार चर्चा करण्यात अर्थ असल्याचे राऊत यांनी सानितले. निवृत्त न्यायमूर्ती मार्फत या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे त्यांनी वेळी सांगितले.
महाविकास आघाडीची नेते आणि राज्यपालांना भेटणार होते,पण…
भाजपच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासा आघाडीचे नेते गुरुवारी राज्यपाल यांची भेट घेणार होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. आघाडी सरकारची बाजू राज्यपाल यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने भेट टळली आहे. २८ मार्च पर्यंत ते देहरादून ला असणार आहे अस समजले आहे.
काही दिवसापूर्वी राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवास नाकारला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.