मिनी लॉकडाउन बाबत सामनातून खुलासा ‘या दोन’ नेत्यांच्या सहकार्यांनंतरच निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता पुढील उपाय म्हणून लॉकडाउन लावण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र याला विरोधी पक्षाकडून विरोध करण्यात येत होता. हातावर पोट असणाऱ्याना अगोदर पैसे द्या नंतर लॉक डाउन करा अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना राज्यातील परिस्थिती बाबत माहिती दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी सरकारला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर राज्यात मिनी लॉकडाउन लावण्यात आल्याचे सामनातून स्पष्ट केले आहे.
सामनाच्या अग्रलेखात कोरोनाच्या परिस्थिती बाबत भाष्य करण्यात आले आहे. भाजपसह मनसेचा लॉकडाउनला विरोध होता. जर लॉकडाउन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा या पक्षांनी दिला होता. जर सरकारने लॉकडाउनचां निर्णय घेतला तर हे पक्ष सहकार्य करतील का असा प्रश्न ठाकरे सरकार पुढे निर्माण झाला होता. तसेच त्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला असता तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सरकारने मिनी लॉकडाउन केले असल्याचे सामनातून स्पष्ट केले.
कोरोना वाढत असताना नागरिकांच्या बेफिकिरी बद्दल अग्रलेखात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “कोरोना वाढत असताना जुहू चौपाटी येथे फिरणाऱ्या गर्दी दिसली, पुण्यात मंड्या, बाजारात पाय ठेवायला जागा नाही. पंढरपूर पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षनाही समोरची विनामास्क गर्दी पाहून आपला मास्क काढण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असच पुढाऱ्यांना वाटत आहे. तिकडे पश्चिम बंगालच्यां निवडणुकीत सुध्दा कोरोना चिरडून मेला की काय असा टोला सुद्धा अग्रलेखात लगविण्यात आला आहे.
मोदी हे परमेश्वराचे अवतार नाही!
‘पंतप्रधान मोदी तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. मोदी हे नक्कीच परमेश्वराचे अवतार नाही. तसे असते तर त्यांनी जादूच्या छडीने छूमंतर करून कोरोनाचां पराभव केला असता. असंही शिवसेनेने म्हंटले आहे.