|

महाराष्ट्रात न्याय मिळेल ही अपेक्षा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आत्महत्या केलेल्या खासदाराच्या कुटुंबियांचा विश्वास

मुंबई: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. केंद्र सरकार कडून कुठलीही मदत करण्यात आली नसल्याचे त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने सांगण्यात आले. मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली.

दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी खासदार मोहन डेलकर यांना त्रास दिल्यानेच त्यानी आत्महत्या केल्याचे अभिनव डेलकर याने सांगितले.

तसेच अभिनव म्हणाला, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वडिलांचा छळ सुरु होता. ७ वेळा ते लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. १९८९ पासून ते खासदार आहेत. एवढ्या मजबूत माणसाने जर हे पाऊल उचलल असेल तर त्यांना किती त्रास दिला याचा विचार करावा.

महाराष्ट्र सरकार, पोलीस यांनी लवकरात लवकर पाऊल उचलायला हवे. त्यांनी लिहिलेले पत्र मी वाचले आहेत. त्यांना काही गोष्टींसाठी त्रास दिल्याचे लिहिले आहे. केंद्रशाशित प्रदेश असल्याने प्रमुख हा शासकीय कर्मचारी असतो. त्यांना त्रास देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. ३० ते ४० प्रकरणात त्यांना मानसिक त्रास दिला. त्यांना त्रास देण्याचे कारण म्हणजे ते अपक्ष निवडून येत होते. केंद्र सरकारकडून आम्हाला कुठलाच फायदा मिळाला नाही. दादरा नगर हवेली मध्ये प्रशासकाची तानाशाही सुरु केली असल्याचे सांगत मोहन डेलकर यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते असा आरोप सुद्धा केला आहे. आमच्या मालकीचे एक कॉलेज आहे. प्रशासक प्रफुल्ल पटेल यांची तेथील जागेवर नजर होती. त्या जागेवर कब्जा करायचा त्यांचा इरादा होता. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कम सुद्धा मागितली होती. त्या जागेवर कब्जा मिळविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे वडिलांनी आत्महत्या सारखे पाऊल उचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाणून घेतले आहे. यांच्याकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *