Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचामतदानापूर्वी नेत्याच्या घरी सापडलं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन

मतदानापूर्वी नेत्याच्या घरी सापडलं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन

कोलकाता: आसामनंतर पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएमबाबत एक मोठी घटना उघडकीस आली आहे. हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया उत्तर विधानसभा सीटवरील टीएमसी नेत्यांच्या घराबाहेर सोमवारी रात्री उशिरा ईव्हीएम सापडले. स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवताच निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरवात केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु झाले आहे. बंगालमध्ये आज एकूण ३१ जागांसाठी मतदान होत आहे. मतदान सुरु होताच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेसने मतदान केंद्रांवर मतदारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे तृणमूल नेत्याच्या घराच्या बाहेर ईव्हीएम सापडल्याचा दावा भाजपने केला आहे.
उलुबेरिया उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवारी चिरन बेरा यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. मतदानाच्या आदल्या रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांच्या घराच्या बाहेर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळल्याचा दावा बेरा यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीत गडबड करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. रात्री उशिरा इथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षादलांनी सौम्य लाठीमार केला.
टीएमसी नेते गौतम घोष यांच्या घराबाहेर अनेक सीलबंद ईव्हीएम सापडले आहे. ४ ईव्हीएम मशिन्स आणि ४ व्हीव्हीपॅट मशिन सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या मशिनचा मंगळवारी असणाऱ्या मतदानाशी कोणताही संबंध नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने गदारोळ करत कारवाईची मागणी केली. पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सेक्टर अधिकारी म्हणाले, आम्ही सेक्टर कार्यालयात पोहोचलो तोपर्यंत सीएपीएफने ते बंद केले होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाने सेक्टर ऑफिसरला निलंबित केले आहे. ते आरक्षित ईव्हीएम होते, जे निवडणूक प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे सर्वांवर गंभीर कारवाई केली जाणार आहे.

आसाममध्येही ईव्हीएम सापडले
यापूर्वी आसाममधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप उमेदवाराच्या पत्नीच्या कारमध्ये ईव्हीएम सापडले. दरम्यान, आसाममधील करीमनगर शहराच्या बाहेरील भागात हिंसाचार झाला आणि त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ईव्हीएमला स्ट्रांग रूममध्ये नेण्यासाठी भाजपा उमेदवाराचे वाहन वापरल्या जात असल्याचा लोक निषेध करत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments