|

अखेर महाविकास आघाडीला सद्बुद्धी सुचली

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

“लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हा उपाय

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे तर काही जिल्हे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत चाचण्या वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे.

            कोरोनाला आटोक्यात आणण्याचा उपाय सांगितला आहे. याबाबत फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी “लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! असे सांगितले आहे. तसेच चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली असाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

आता हे सूत्र कायम ठेवा

राज्यात लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या १० दिवसांत सरासरी १ लाख २६ हजार ९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणाऱ्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे आता हे सूत्र कायम ठेवा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

काल दिवसभरात ३६ हजार ९०२ रुग्ण

राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नवे रुग्ण आढळून आले. तर ७१ हजार १९ रुग्ण उपचारा नंतर बरे झाले. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के आहे. शुक्रवारी दिवसभरात ११२ रुग्णाचा मृत्यू झला. राज्यातील मृत्युदर २.०४ टक्क्यावर पोहचला आहे.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *