इतक्या दबावाखाली असताना देखील मुंबई पोलिसांच्या विनोदबुद्धीची दाद द्यायला हवी…!

Even under such pressure, the humor of Mumbai Police should be appreciated…!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : सोशल मीडियाचा मुंबई पोलिसांनी पुरेपूर वापर करून वेळोवेळी मुंबईकरांना सतर्क केल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे. मुंबई पोलीस नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. दरम्यान मुंबईत प्रवसा करायचे असेल तर पोलिसांकडून वाहनावर विविध कलरचे स्टीकर लावण्यात आले आहे. या स्टीकरच्या रंगाबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत नागरिक वेळोवेळी पोलीस्ना प्रश्न विचारत आहेत. तर काही प्रश्न गमतीशीर सुद्धा असतात. असाच एक गमतीशीर प्रश्न तरुणाने ट्वीटच्या माध्यामतून विचारला. पोलिसांनीही तितक्याच जबरदस्त पद्धतीने त्याला उत्तर दिले.

अश्विन विनोद या ट्वीटर वापरकर्त्याने मैत्रिणीला भेटायला जाण्याबद्दल विचारणा केली. “मला मैत्रिणीला भेत्याला जायचं आहे. त्यासाठी माझ्या गाडीवर कोणत्या कलरच स्टीकर लावू अशी विचारणा त्याने केली” मैत्रिणीला भेटने तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे हे समजू शकतो.मात्र, दुर्दैवाने ही गोष्ट आमच्या अत्यावश्यक गोष्टीच्या लिस्ट मध्ये नाही. अस ट्वीट मध्ये म्हटले आहे.


मुंबई पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात ट्विटच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्यासाठी कित्येक अनोख्या शक्कल लढवल्या. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मिम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीसांनी सामान्य लोकांना जागरूकही केलं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *