महिलांना वाट काढून दिली तरी गुन्हा दाखल होतो तो पुरुष ; आव्हाडांनी व्यक्त केली खंत

जितेंद्र आव्हाड
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. दरवर्षी १९ ला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक-आर्थिक उपलब्धी ओळखण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

भारतातही आंतरराष्ट्रीय पुरुष दिन उत्साहात साजरा केला जातो. राजकीय वर्तुळातही पुरुष दिन आणि एकमेकांनी दिलेल्या शुभेच्छांची चर्चा असते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक ट्विट केलंय. सध्या आव्हाड हे विनयभंगाच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहेत. आणि याच मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय.

”काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो..
स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो..
हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो..
हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो..
आणि
गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *