लस घेतल्या नंतरही रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण
मुंबई: राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ कोरोना बाधित आढळून आले आहे. कोरोनाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी नुकतीच ११ मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. २० मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनची लागण झाली होती. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यानी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता रश्मी ठाकरे यांना सुद्धा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या रश्मी ठाकरे या होम क्वारणटाईन मध्ये असणार आहे.
राज्यातील काही शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात बाधितांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. जर बधितांची संख्या नियंत्रणाच्या बाहेर गेली तर लॉकडाउन करण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ कोरोना बाधित आढळून आले. तर, १३ हजार १६५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात २ लाख ३० हजार ६४१ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी दिली.