Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचारोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांचा थेट लॉकडाउनचा...

रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांचा थेट लॉकडाउनचा इशारा.

मुंबई: राज्यभरात कोरोनाने थैमान घातला आहे. बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. तर काही शहरात रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी रात्री आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती बाबत माहिती दिली. तसेच राज्यातील जनतेला लॉकडाउन बाबतचा इशारा दिला. नागरिकांनी नियमाचे पालन केले नाही तर पुढील दोन दिवसात लॉक डाउन बाबतचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला जीव वाचवायचे आहेत. मी आज लॉकडाउनचां इशारा देत आहे. मी परिस्थिती बघेन. अधिकाऱ्यानं कडून आढावा घेईल जर बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाउन घेण्याबाबतचां इशारा देतो. आता पासून ठरवूया. आपण लाट रोखू असही ते म्हणाले.

मी मागे म्हणालो होतो की परिस्थिती जर अशीच राहिली तर आपल्याला लॉकडाउन लागू करावा लागतो की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही आहे.मधल्या काळात आपण शिथिल राहिलो. लग्न, पार्ट्या, मोर्चे, आंदोलन सुरू झाले. कोरोना गेला अशा रीतीने हे सगळं सुरू होत. दुर्दैवाने तज्ञ जी भीती दाखवत होते ती खरी ठरली आहे. मार्च महिन्यात गेल्यावेळी पेक्षा आक्रल विक्राळ रूप धारण केले आहे. हा विषाणू आपली परीक्षा बघत आहे. आपल्याला धैर्याने लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

काही निर्बंध येत्या काही दिवसात लावावे लागणार आहेत. ते उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येतील. रोजगार परत मिळतील. पण जीव परत मिळणार नाही नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विरोधकांनी राजकारण करू नये
मधल्या काळात कोरोनाचि दहशत गेल्याने आपण गाफील होतो. अजूनही कोरोणावर आपन मात केली नाही. आपणच त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो की कृपा करून जनतेच्या जिवाशी खेळ होईल अस राजकारण करू नका. सरकार हे पाऊल उचलत आहे ते जनतेसाठी आहे. अस आवाहन ठाकरे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments