या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहिर होणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक
दिल्ली: देशातील ५ राज्याच्या विधानसभेची मुदत मे, जून मध्ये संपत आहे. राजकीय पक्षांनी आता पासून जोरदार तयारी सुरु केली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडणार आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ यांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहे. यापूर्वी कोरोना काळात बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर अनेक जणांनी टिका केली.
या निवडणूकांकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पश्चीम बंगाल मध्ये तळ ठोकून आहेत. पश्चीम बंगाल मध्ये भाजपने पूर्ण ताकत लावल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पश्चीम बंगाल मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजप जोर लावत आहेत.
तर, तामिळनाडू राज्य सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. पश्चीम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे रोजी संपणार आहे. आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपणार आहे. केरळचा कार्यकाळ १ जुन रोजी संपणार आहे. तर पद्दुचेरी राज्याचा कार्यकाळ ८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मात्र, गेल्या काही दिवसात देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कशा प्रकारची नियामवली तयार करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.