|

डॉ विश्वजीत कदम यांनी खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत दिली माहिती; म्हणाले…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

खासदारास ७ दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण

पुणे : कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे शहारातील जहांगीर हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जहांगीर हॉस्पिटलमधून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत तसेच त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. विश्वजीत कदम यांना पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले आहे.

खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट दिनांक २२ एप्रिल रोजी केले त्यांनतर ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना “दिनांक १९ एप्रिल रोजी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर दिनांक २२ तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. २३ एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र २५ तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे २८ तारखेला त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील.” तसेच गरज पडल्यास पुढिल उपचारासाठी त्यांना मुंबईमध्ये हलविण्याचा विचार करु, असे डॉ. कदम यांनी सांगितले आहे.

यावेळी जहांगीर रुग्णालयाचे डॉ. गील यांनी माहिती देताना सांगितले की, राजीव सातव यांची प्रकृती काल दुपारपर्यंत चांगली होती. मात्र अचानक तक्रारी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे सुध्दा डॉ. गील यांनी सांगितले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *