मोठ्या साहेबांवर पीएचडी करतोय; यांच्यावर एमफील करावी लागेल

दिल्ली: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारा दरम्यान हे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, ते मी पाहता अस वक्तव्य केल होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पडणारा अजून जन्माला यायचा आहे असे उत्तर दिले होते.
याबाबत बोलतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार एवढा अहंकार बरा नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना पडल्या. तुमच सरकार १५ वर्ष होत. ते सरकार परत येईल अस वाटल ते आल नाही. ९५ ते ९९ युतीच सरकार होते. ते पुन्हा येईल अस वाटल होत. मात्र ते आल नाही. कोणीही अहंकार बाळगण्याच कारण नाही. ही भाषा बरोबर नाही. राजकारणात तेच बोलायचं असत मात्र नीट बोलायचं असते. आम्हाला बोलता येत नाही अस अजित पवार यांनी समजू नये अशी टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. फडणवीसांना बोलण्याचे अधिकार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाले की तेच उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तरी तेच उपमुख्यमंत्री. उद्या जार कम्युनिस्टांच सरकार आले तरी ते उपमुख्यमंत्री होतील. सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक, अनेक कारखाने गडप केले हे विषय संपायचे आहेत. मला यांच्यावर एमफील करावे लागेल. मोठ्या साहेबांवर पीएचडी करतोय; यांच्यावर एमफील करावे लागेल असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. ही भाषा राजकारणात चांगली नाही. आम्हीही कधीही भाषा वापरली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.