आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का ? भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टिका

मुंबई : केंद्र सरकारकडून 1 पासून संपुर्ण देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी काल पासून ऑनलाईन नोंदणीस सुध्दा सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. हे लसीकरण राज्यात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होणार नाही या कारणाने लांबणीवर टाकले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेव्दारे सांगितले आहे. दरम्यान या निर्णयावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टिका केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांनी सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का? काल सकाळी म्हणाले 1 तारखेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगतात की या नागरिकांना लसीकरण करता येणार नाही. यामुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी टिका आमदार पडळकर यांनी आज केली आहे. दरम्यान पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, राज्य सरकारला उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत. हे भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आले असल्याचं पडळकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.