परीक्षा घेऊन मृत्यूची संख्या वाढवायची आहे का? विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना रोकठोक सवाल

पुणे: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी होणारी MPSC सयुक्तिक पूर्व परीक्षा होत आहे. ही परीक्षा महिनाभरासाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. MPSC समन्वय समितीच्या वतीने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लोकसेवा आयोगाचे सचिव यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्याला कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून परीक्षा घेऊन आपणास मृत्यूची संख्या वाढवायची आहे का? असा रोकठोक सवाल विचारला आहे.
MPSC समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्वीट करून परीक्षा झाली तर परिस्थिती बाहेर जाईल असे सांगत परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे.
MPSC समन्वय समितीच्या वतीने ट्वीट करून काय मागणी केली
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मागे आम्ही जे आंदोलन केले होते त्याबाबत आपल्या मनात अमच्याविषयी राग नक्की असेल पण सध्या तो राग मनात धरून परीक्षा पुढे न ढकलणे योग्य नाहीये. आमचे कित्येक बांधव आणि भगिनी कोरोना बाधित आहेत. कोणाचे आई वडील ऑक्सिजन वर आहेत तर कोणाच्या घरचा मृत्यू झाला आहे. परीक्षा झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. केंद्रास्थारावरील परीक्षा पुढे जात असतांना MPSC ची परीक्षा होत असेल तर आम्ही काय समजायचे. आज पर्यंत आमचे ३ बांधव मृत्युमुखी पडले आहेत, परीक्षा घेऊन मृत्यूची संख्या वाढवायची आहे का? असा रोकठोक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.