Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचा'पहचान कौन?' विचारतायत अमृता फडणवीस!

‘पहचान कौन?’ विचारतायत अमृता फडणवीस!

मुंबई : विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी ट्वीट करून राजकीय मत व्यक्त करत असतात. नुकतेच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर ट्वीट करून भाई जगताप यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात. पण या ट्रोलिंगला न घाबरता अमृता यांनी त्यांचा हा बिनधास्तपणा कायम ठेवला आहे. त्यांच्या याच स्वभावाची झलक त्यांच्या प्रत्येक ट्विट वरून पाहायला मिळते.
भाजपकडून या ना त्या प्रकारे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशात अमृता फडणवीस मागे कशा राहतील? त्यादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार राज्य सरकारवर त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असल्याचं पाहायला मिळतं. मिसेस फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये एक कोडं घातलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया या टीकात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments