Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचालग्नाअगोदर गरोदर राहण्याच्या प्रश्नावर दियाचं सडेतोड उत्तर!

लग्नाअगोदर गरोदर राहण्याच्या प्रश्नावर दियाचं सडेतोड उत्तर!

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा यांनी आपल्या अभिनयासोबतच शांत आणि स्वभावा करताही ओळखली जाते. दियाने आपल्या नव्या आयुष्याला नुकतीच सुरूवाच केली आहे. फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीने वैभव रेखीसोबत लग्न केलं. यानंतर मार्च महिन्यात दियाने आपण गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरने प्रेग्नेंसीच्या वेळेबाबत प्रश्न विचारला. यावर दियाने अतिशय सडेतोड उत्तर दिलंय.

युझरने दियाला काय विचारला प्रश्न?
दियाला विचारण्यात आलं की, हे स्टीरियोटाइप कधीपर्यंत चालणार आहे. कोणती महिला आपल्या लग्नाच्या अगोदर प्रेग्नेंसी का अनाऊन्स करत नाही. का एक महिला लग्नाच्या अगोदर गरोदर राहू शकत नाही?

दियाने काय दिलं उत्तर?
खूपच रोचक प्रश्न आहे. पहिलं तर हे समजून घ्यायला हवं की, आपण लग्न काय मुलं हवीत म्हणून करत नाही. लग्न आपण एकमेकांच्या सहमतीने करत असतो कारण आपल्याला एकत्र जीवन जगायचं असतं. जेव्हा मी लग्न प्लान करत होते तेव्हाच मी प्रेग्नेंट असल्याचं समजलं. त्यामुळे लग्नाचा प्लान आमचा पहिल्यापासूनच होता. लग्नाचा आणि माझ्या गरोदरपणाचा काही संबंध नाही.

तसेच दिया म्हणते की, प्रेग्नेंसी मेडिकली सेफ असल्याचं सांगत नाही तोपर्यंत आपण अनाऊन्स करत नाही. ही माझ्या जीवनातील सर्वात आनंदाची बातमी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी याची वाट पाहत होते. कोणत्या कारणामुळे मी माझी प्रेग्नेंसी लपवू? असा सवाल देखील दियाकडून विचारण्यात आला.
हल्ली दीया मिर्झा मालदीवमध्ये तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. दीयाने तिच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अलीकडेच तिने तिचे बिकिनीमध्यील फोटो शेअर केले होते. आता तीने काही पांढऱ्या मॅक्सीमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्याबरोबर एक मुलगी दिसत आहे आणि फोटोतील दीयाबरोबर दिसणारी ही मुलगी कोण अशी सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments