क्रिकेट वर्तुळात ‘बेझबाॅल’ची चर्चा; हा प्रकार नेमका आहे तरी काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. भारताचं वर्चस्व असलेला मालिकेवर भारतीय संघ सहज जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अखेरच्या दोन दिवसात इंग्लंडने वेगळी रणनिती आणली आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागतो.
पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने अखेरचा सामना जिंकून मलिका 2-2 ने बरोबरीने रोखली. शेवटच्या डावात भारतीय गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्लंडने आक्रमक धोरणाचा अवलंब केला.
सामन्याचा लेखाजोखा-
सर्वप्रथम भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांना चांगली सुरूवात मिळून देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरला.
रिषभ पंतने 146 तर रविंद्र जडेजाने 104 धावा केल्या. दोघांनी सुरूवातीला सावध आणि अखेरीस आक्रमक फलंदाजी शतक ठोकलं. शतकीय खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
भारताने दिल्या 416 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ 284 धावांवर आटोपला. अॅलेक्स लीज, ओली पोप, जो रूट यांसारखे खेळाडू फेल ठरले. त्यावेळी जाॅनी बेअरस्टोने इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. बेअरस्टोने शतक ठोकलं. त्याने पहिल्या डावात 106 धावा केल्या.
भारताला पहिल्या डावात 132 धावांची लीड मिळाली. त्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जास्त वेळ मैदानात टिकू दिलं नाही. शुभमन गिल, हनुमा विहारी आणि विराट कोहली झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा मात्र एक बाजू सांभाळून खेळत होता. पुजाराने 66 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर इतर कोणताही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही.
पहिल्या डावात शतक ठोकणारा जडेजा देखील 23 धावा करत बाद झाला. पुजाराच्या 66 धावांच्या बळावर भारतीय संघ दुसऱ्या डावात 245 धावांवर कसाबसा पोहोचला. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 378 धावा करण्याची गरज होती.
इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरूवातीला सावध फलंदाजी केली मात्र, भारतीय गोलंदाजांनी मैदानात टिकणं अवघड केलं. कर्णधार बुमराहची गोलंदाजी एका बाजूने आग ओकत होती तर रविंद्र जडेजाच्या स्पिन अटॅक फलंदाजीसाठी अवघड जात होता.
अॅलेक्स लीज, कराॅले आणि ओली पोप बाद झाल्यानंतर जाॅनी बेअरस्टो आणि जो रूटने मैदान हातात घेतलं. त्यावेळी इंग्लंडच्या कॅप्टनने स्ट्राॅटेर्जी बदलली आणि एजबस्टनच्या मैदानात ‘ब्रेझबाॅल’ डावपेच पहायला मिळाला.
‘बेझबाॅल’ डावपेच असतो तरी काय?
इंग्लंडच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सची निवड करण्यात आली होती. त्याचवेळी प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि विस्फोटक खेळाडू ब्रेंडम मॅक्युलम याची निवड करण्यात आली होती. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे ब्रेंडम मॅक्युलम ‘बेझ’ असं टोपन नाव पडलं.
ब्रेंडम मॅक्युलमने इंग्लंडच्या संघाला डावपेच शिकवण्यास सुरूवात केली. ब्रेंडम मॅक्युलम हा आक्रमक खेळाडू. प्रशिक्षण देताना देखील अनेक आक्रमक डावपेच इंग्लंडच्या खेळाडूंना शिकवले. त्या डावपेचाला ‘बेझबाॅल’ म्हणून ओळखलं जातं.
ब्रेंडम मॅक्युलम हा मुळ न्यूझीलंडचा खेळाडू तरी देखील मॅक्यूलयमने न्यूझीलंडविरूद्ध आक्रमक रणनिती आणत न्यूझीलंडला हारवलं. त्यानंतर बेझबाॅलच्या जोरावर मॅक्यूलमने भारताला मालिका विजयापासून रोकण्याचा पराक्रम करून दाखवला.
कसोटी सामन्यात षटकांची मर्यादा नसते आणि पाच दिवस खेळ चालतो. कार्यक्रम एकदम रिलाॅक्स असतो. त्यामुळे मैदानात बाॅटिंग करताना हाणामारी करणं सहसा पहायला मिळत नाही. मात्र, अतिमर्यादीत सिरीजच्या ओघामुळे नवीन तरूण खेळाडू सामना पटकन संपवण्याच्या दृष्टीने पाहतात.
एखादा सामना आपल्या टप्प्यात आणायचा आणि अखेरच्या क्षणी फटकेबाजी करून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचं आणि सामना खिश्यात घालायचा, अशी रणनिती आखली जाते. ब्रेंडम मॅक्युलमच्या प्रशिक्षणाच्या काळात हेच पहायला मिळालं आहे.
कसोटी सामन्यात बेझबाॅलला महत्त्व आहे का?
आयपीएल लीगमुळे अनेक गुणवंत खेळाडू भारताला मिळाले. आक्रमक खेळी करत अनेकांनी भारतीय संघात स्थान मिळवलं. त्यातच एक नाव म्हणजे रिषभ पंत. रिषभने आक्रमक फटकेबाजी करत पहिल्या डावात शतक झळकावलं. त्यावेळी देखील बेझबाॅलची चर्चा होती.
2004-06 च्या काळात ऑस्ट्रेलियन संघ तगड्या खेळाडूंनी भरलेला होता. अॅडम गिलख्रिस्त, शेन वाॅर्न, रिकी पाँटिंग, शेन वाॅटसन, अँड्यू सायमंड यांसारखे खेळाडू विरोधकांना मैदानात चक्क लोळवत होते. संघ त्यावेळी शिखरावर होता. ऑस्ट्रेलियन संघात देखील बेझबाॅल स्टॅट्रजी असायची असं म्हणतात.
काळानुसार क्रिकेटचं स्वरूप बदलत चाललं आहे. त्यामुळे क्रिकेटला आक्रमकतेचं स्वरूप आलं. कसोटी क्रिकेटमध्ये देखील आता खेळाडू नॅचरल पद्धतीने खेळतात. त्यामुळे आगामी काळात बेझबाॅलला महत्त्व येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा की-
PV Sindhu: पहाटे 3 पासून सुरू झालेला प्रवास ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलाय, आता…