Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचारेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत जाहिरात

रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत जाहिरात

मुंबई : कोरोनाचं थैमान राज्यात इतकं वाढलं आहे की, सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहे. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीरसाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.
कोरोना आणखी काय काय रुप दाखवेल याचा भरवसा नाही. देशात कोरोना संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. राज्यातही रुग्णांच्या दगवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता संपूर्ण राज्यात आहे.
राज्य सरकारने केंद्र आणि इतर राज्यांमधून रेमडेसिवीर मिळते का याची तपासणी करून झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये रेमडेसिवीरसाठी जाहिराती दिल्या आहेत.
या जाहिरातींना काही देशातून प्रतिसादही आल्याची माहिती समोर येत आहे. सिंगापूर, बांग्लादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारचा या देशांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच त्याबाबतची प्रकिया सुरू करणार असल्याची माहिती मिळतेय.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले होते. राज्याला आवश्यक असलेल्या प्रमाणात इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार राज्यानं वारंवार केली होती. त्यानंतर निर्यातीशिवाय पडून असलेल्या इंजेक्शन मिळवण्यावरूनही वाद झाला. इंजेक्शनच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यानं दोन्ही राज्य आणि केंद्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण आता रुग्णांसाठी इतर मार्गाने इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून, आता इतर देशांमधील कंपन्यांकडून सरकार ते खरेदी करण्याचा प्रयत्न करतंय. त्याला यशही येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments