दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री?

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होतें. देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये टार्गेट दिले असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. यानंतर झालेल्या हालचालीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
त्यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे गृहमंत्री ओढून आणण्यासाठी काही जण विशेष प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू असणारे दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे बोलण्यात येत आहे. याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे नाव सुद्धा घेण्यात येत आहे