|

दिलीप वळसे पाटील नवीन गृहमंत्री

737 candidates who are eligible for PSI examination will be sent for training
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळील म्हणून त्यांची ओळख आहे.  

वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक पदापासून सुरु झाला. त्यांनी आता पर्यंत अनेक खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे पत्र राज्यपाल यांना लिहिले आहे. गृहविभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्या हाती द्यावा असे पत्रात नमूद केले आहे.

सध्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेल्या कामगार विभागाचा अतिरिक्त भार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुक्ल विभागाचा अतिरिक्त कार्यभाग अजित पवार यांच्याकडे द्यावा असेही नमूद केले आहे.

परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये टार्गेट दिले असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. यानंतर झालेल्या हालचालीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. पश्चिम महाराष्ट्राकडे गृहमंत्री ओढून आण्यासाठी काही जण विशेष प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू असणारे दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे बोलण्यात येत आहे. याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील,  अजित पवार यांचे नाव सुद्धा चर्चेत होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *