आणखी एका ‘स्टार किड’ला लॉन्च करणार धर्मा प्रॉडक्शन!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: अनिल कपूरचा भाऊ अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओबरोबर तिने एक पोस्टही लिहिली आहे. शनाया लिहिते की, आज मी खूप खूप आनंदी आहे. धर्मा फिल्म प्रॉडक्शनसोबत आता एक मोठा प्रवास करायचा आहे. धर्मा मूव्हीजबरोबर जुलैमध्ये मी माझ्या पहिल्या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करत असून त्यासाठी खूपच उत्सुक आहे. आणि यासंदर्भात तुम्हाला मी अधिक माहिती देण्यासाठी आतुर आहे…’ असे पोस्ट करत शनायाने बॉलिवूडमधील पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून शनाया कपूर तिचे अतिशय ग्लॅमरस अंदाजामधील फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट करत आहे. तसेच तिने नृत्याचा सराव करतानाचेही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावरून ती लवकरच एखादा सिनेमा करत असल्याची घोषणा करेल, असा अंदाजही व्यक्त होत होता. हा अंदाज आता खरा ठरला आहे. त्यामुळे आता कपूर खानदानातील आणखी एक कन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

बॉलिवूडमधील स्टार किड्ससाठी करण जोहर हा खास निर्माता आहे. आलिया भट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे या स्टार किड्सची बॉलिवूडमध्ये झालेला प्रवेश हा करणच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे. या सर्वांनी पहिला सिनेमा करण बरोबरच केला आहे. आता यामध्ये आणखी एका नावाचा लवकरच समावेश होणार आहे. या स्टार कन्येसाठी करणच्या धर्मा प्रॉडक्शनतर्फे सिनेमा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही माहिती खुद्द त्या स्टार कन्येने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *