देवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू, गंभीर चुकांचं समर्थन करू नका,संभाजीराजेंची प्रतिक्रिया.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवरील केलेल्या वक्तव्यावर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनीही त्रिवेदींच्या वक्तव्याचा निषेध करत उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीसांना आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीस अभ्यासू माणूस आहेत. त्यांनी अशा चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका. सुधांशू त्रिवेदी यांना माफी मागण्यासाठी भाग पाडा, संभाजीराजे म्हणालेत. रात्री एक वाजता मी देवेंद्रजीची प्रतिक्रिया पाहिली. अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठ राखण करणं हे अयोग्य आहे, असंही संभाजी राजे म्हणालेत.

देवेंद्रजी अशी पाठराखण का करताय असा मला प्रश्न पडलाय. वेळप्रसंगी मी देवेंद्रजींना याबाबत विचारणारही आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. माझं स्पष्ट मत आहे की, सुधांशू त्रिवेदी यांनी शिवभक्तांची माफी मागितलीच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.देवेंद्रजींनी सुधांशू त्रिवेदीच्या माफी कडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

काय म्हणाले सुधांशू त्रिवेदी:

आजतक या वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलताना त्यांनी हे विधान केलंय. औरंगजेबाला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ वेळा माफी मागितली , असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *