|

देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट!

Devendra Fadnavis to meet Sharad Pawar!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्याचे प्रकरण, सचिन वाझेंना अटक, महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा या घडामोडींनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास स्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा भेट घेणार आहे.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे मागील आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सिल्वर ओक या निवास स्थानी विश्रांती घेत आहे.

हे निर्बंध विचार न करता लावण्यात आले आहेत – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली. कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे. या सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेणे अपेक्षित होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे निर्बंध विचार न करता लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले जातील असं म्हटलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सातही दिवस लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष आहे. यातून मार्ग काढण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
केंद्र सरकारकडून आवश्यक लसींचा पुरवठा होतो आहे. मात्र कधीकधी लसी कमी पडतात. आजच्या घडीला महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा होत आहे. भारत सरकारशी चर्चा करुन याबाबत मागणी केली पाहिजे. मीडियात येऊन याबाबत बोलणे योग्य नाही. यामध्ये राजकारण होता कामा नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *