देवेंद्र फडणवीस खोटे बोलणे थांबवा. मोदींचे आभार मानणे योग्य नाही

मुंबई : राज्यातील कोरोनाची बाधितांची परिस्थिती गंभीर आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेंटीलेटरचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रातून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाली असल्याचा दावा करत आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ऑक्सिजन पुरवठ्या बाबत ट्वीट केले असून देवेंद्र फडणवीस यांना कृपया खोटे बोलणे थांबवा असे सांगितले आहे. तसेच हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले देवेंद्र फडणवीस खोटे बोलणे थांबवा
“देवेंद्र फडणवीस आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मेट्रिक टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.
तथ्य महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे १२५० मे.टन आहे केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेला ऑक्सिजन भिलाई ११० मे.टन /दिन बेलारी ५० मे.टन /दिन जामनगर १२५ मे.टन/दिन व्हायजॅग – ६० मे.टन सरासरी ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदा ११० मे.टन आणले आहे
एमव्हीए सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १७५०० मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु ३४५ मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे कृपया खोटे बोलणे थांबवा” असेही सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून काय केला होता दावा?
महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.
प्रिय @dev_fadnavis जी, आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. https://t.co/JZZhFAk3u9
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 26, 2021