Sunday, September 25, 2022
HomeUncategorized'तू काजोल सारखी दिसतेस' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलतं अमृताला प्रपोज!

‘तू काजोल सारखी दिसतेस’ म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलतं अमृताला प्रपोज!

मागील काही दिवसात राज्यातील राजकारण बदलेलं पहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदेशाही सुरू झाली. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आली त्याला कारण होतं, देवेंद्र फडणवीसांचं मुसद्दी राजकारण…

राज्यात पुन्हा शिवसेना आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अमृता फडणवीसांनी गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस खूप रात्रीपर्यंत काम करायचे. रात्रीच्यावेळी जाॅकेट वेगैरे घालून ते घराबाहेर पडायचे. डोळ्यावर चष्मा घालायचे. त्यामुळे मलाही ते ओळखू येत नसत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

मी त्यांना विचारलं तर ते उत्तर देणं टाळायचे. त्यावेळी मला वाटायचं की काही ना काही राजकीय सुरू आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रात्रीच्या वेळी फडणवीसांची भेट होयची, असं म्हटलं होतं. त्यामुळे अमृता फडणवीसांना राजकारणातील धागेदोरे माहिती असतात, असे निकष आता लावले जात आहेत.

अमृता-देवेंद्र फडणवीसांची पहिली भेट

देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांची पहिली भेट देवेंद्र यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्र फडणवीसांनी अमृतांला ‘तू काजोल सारखी दिसतेस’, असं म्हणून प्रपोजही केलं.

हळूहळू मैत्री वाढत गेली. बोलणं चालणं वाढलं. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णवेळ राजकारण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अमृतांना स्पष्ट सांगितलं होतं ‘मी तुला वेळ देऊ शकत नाही. मी तुला पैसे देऊ शकत नाही’. त्यावेळी अमृता म्हणाल्या, तु व्यसन करणार नसशील तर मी तयार आहे. लेखिका सुषमा नवलखे यांच्या पुस्तकात याचा उल्लेख मिळतो.

देवेंद्र फडणवीस दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च 2005 मध्ये दोघांचं लग्न झालं. अमृता फडणवीस या नागपूरचे प्रसिद्ध डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या होत्या.

माणूस चांगला आहे. मला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. माझ्या आईचं घर बाजूलाच आहे, या गोष्टी लक्षात ठेवून लग्न केलं होतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. अमृता या बँकिंग क्षेत्रात मागील 17 वर्षांपासून कार्यरत आहेत.

आमच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे काय, हे माहिती नव्हतं, असा खुलासा देखील त्यांनी केला होता. अमृताच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील दुजोरा दिला. मतदान कार्ड लग्नानंतर काढलं, असं फडणवीस म्हणाले.

अमृतामुळे देवेंद्र फडणवीसांना अडचणींचा सामना करावा लागला…

2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याआधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी फडणवीसांनी सांभाळली होती. त्याचा फायदा फडणवीसांनी राज्यात आपला वट निर्माण करण्यात झाला. फडणवीस म्हणजे आरएसएसच्या मातीत तयार झालेले नेते. त्यामुळे पक्षावर आपली पकड मजबूत करण्यात त्यांना यश आलं.

पक्षांतर्गत असलेले विरोधक फडणवीसांनी संपवले असं म्हटलं जातं. एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासारखे नेते पक्षातून बाजूला होत गेले. त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली. अमृता फडणवीसांनी पाॅलिटिकल विषयांवर मतं मांडली. त्यामुळे अमृता सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.

अमृता फडणवीसांना त्यांच्या गाण्यामुळे ट्रोलिंग झाली. राजकीय वक्तव्यामुळे अमृता फडणवीस चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. अनेकदा त्यांची खिल्ली उडवली गेली मात्र, त्यांनी कधी ट्रोलर्सला महत्त्व दिलं नाही, असं त्या स्वत: सांगतात.

अॅक्सेस बँकेचं प्रकरण-

अमृता फडणवीस अॅक्सेस बँकेत मोठ्या हुद्द्यावर असल्याने फडणवीस सरकार बँकेला झुकतं माप देत असल्याचा आरोप होत होता. राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती अॅक्सेस बँकेत वळवण्यात आली, असा आरोप करणारी याचिका मोहनीष जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून अॅक्सिस बँकेकडे केंद्रीय विद्यालय, नगरविकास, मुंबई पोलीस, धर्मादाय आयुक्त अशा अनेक विभागांची खाती आहेत. राज्यातील पोलिसांचे वेतन गेल्या कित्येक वर्षांपासून ॲक्सिस बँकेमार्फत दिलं जातं, असं उत्तर सरकारकडून देण्यात आलं होतं.

माझं आणि देवेंद्रजींचं लग्न होण्याच्या आधी ही खाती अॅक्सेस बँकेकडे वळवण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, असं अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.

अमृता फडणवीसांना सगळं माहिती असतं?

2019 च्या निवडणुकीच्या आधीपासून राज्यातील अंतर्गत राजकारणाने वेगळं वळणं घेतलं. निवडणुकीच्या आधी देखील अनेक नेत्यांनी पक्ष बदलले. अनेकांना डच्चू देण्यात आला. त्यावेळी भाजपचं राजकारण फडणवीसांच्या भोवती फिरत होतं.

त्यावेळी अनेक आमदार फडणवीसांना भेटण्यासाठी येत होते. देवेंद्रजींना रात्री फिरण्याची आवड असत. त्यामुळे ते रात्री फिरायचे. त्यांच्याकडून काही काम करून घेयचे असेल तर त्यांच्यासोबत फिरायला जावे, असं अमृता म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीस अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून गौप्यस्फोट करताना दिसतात. तर अनेकदा त्यांनी काही ट्विट डिलीट देखील केली आहे. देवेंंद्र फडणवीसांनी अमृतांना काही ट्विट डिलीट करायला लावलं होतं, असा खुलासा अमृता फडणवीसांनी माझा कट्ट्यावर केला होता.

देवेंद्र फडणवीस सतत काही ना काही वाचत असतात. राज्यातील इन्फ्रास्ट्रचरवर त्यांनी भरपूर काम केलं, असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं देखील सांगितलं.

हे ही वाचा की-

…तेव्हा छगन भुजबळांनी वेशांतर करून कानडी पोलिसांना गुंगारा दिला होता!

‘क्या मस्त है लाइफ’ ते मिर्झापूर, असा होता श्वेता त्रिपाठीचा प्रवास

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments