Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचादेवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; म्हणाले…

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. लॉकडाउन केला तर आम्ही त्याला विरोध करू असा इशारा विरोधी पक्षाकडून देण्यात येत आहे. “मी म्हणतो त्यांनी जरूर उतरावे पण ते सुद्धा कोरोना विरुद्ध अस मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची अस ट्विट करून फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून लॉकडाउन दरम्यान इतर देशातील सरकारने नागरिकांसाठी काय केल याची सविस्तर पोस्ट केली.

आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणाले फडणवीस-
फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, २,२०,२०० उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…

पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले…

आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, ७.४ बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments