Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचादिल्लीकरांना मिळणार मोफत लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

दिल्लीकरांना मिळणार मोफत लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

दिल्ली : १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, आसाम, छत्तीसगड, बिहार राज्याप्रमाणे दिल्लीतही १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे.
लसीकरण वेगाने व्हावे यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींच्या ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केल जाणार असल्याचेही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मोफत लसीकरणाचा फायदा सामान्य जनतेला होईल असही ते यावेळी म्हणाले.
तसेच लसीच्या दरावरून त्यांनी टीका केली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किमतीत लस मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्याचा दावा आहे कि, लस निर्मिती मधून १५० रुपये फायदा होतो. मग वेगवेगळे दर का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. नफा कमविण्यासाठी पुर्ण आयुष्य पडल आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित करायला हवे असे मत व्यक्त केले.
तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यानंतर लस उत्पादक कंपन्यांनी आपले दर जाहीर केले आहेत. यात कोव्हीशिल्ड राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना मिळणार आहे. तर कोवॅक्सीन राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे ही लस केंद्र सरकारला १५० रुपयांना दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments