पुण्यातील रुग्णालयाकडून दिरंगाई; चौकशीत आल्या ‘या’ गोष्टी समोर

पुणे : राज्यासह देशातील काही ठिकाणी रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने कोव्हिड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता.
यात शहरातील २१८ रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरचे फायर ऑडिट करण्यात आले असून त्यात ६१ रुग्णालयात आज प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबतचा अहवाल पुणे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना सादर केला आहे.
शहरातील ६१ रुग्णालये, कोव्हिड केअर सेंटर मधील आज प्रतिबंधात्मक यंत्रणा ऑटोमॅटिक पद्धतीने कार्यान्वित नाही. आग लागली तरीही ही यंत्रणा ऑटोमॅटिक सुरू होऊन आग विझविण्यासाठी तिचा उपयोग होईल. याची व्यवस्था करण्यात आली नाही. अनेक ठिकाणी या व्यवस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
आता पर्यंत रुग्णालयाला आग लागून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे मात्र अजूनही प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
या सर्व रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आली असून आग यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. या त्रुटी १५ दिवसात आता दुरुस्त करणार असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले तर विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या धर्तीवर पुणे शहरातील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या होत्या. त्यात ६१ रुग्णालयात दिरंगाई केल्याचे समोर आले आहे.