दलित भिकारी नाही तर दलित आता शिकारी आहेत- रामदास आठवले

मुंबई: पश्चिम बंगाल विधानसभा मतदानाचा ४ टप्पा काल पार पडला आहे. कूचबिहारी भागात झालेल्या हिंसाचारात ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल कॉंग्रेसच्या सुजाता मंडल यांनी अनुसूचित जाती बद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करून सुजाता मंडल यांचा समाचार घेतला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करून सुजाता मंडल यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “दलित भिकारी नाही तर दलित आता शिकारी आहेत. जे दलितांना भिकारी म्हणतात तेच भिकारी आहेत. अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांनी दलितांबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध” व्यक्त करतो अस त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटल आहे.
दलित भिकारी नाही तर दलित आता शिकारी आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 12, 2021
जे दलितांना भिकारी म्हणतात तेच भिकारी आहेत.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांनी दलितांबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध.
पश्चिम बंगाल मधील आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल कॉंग्रेसच्या सुजाता मंडल यांनी अनुसूचित जाती बद्दल अपशब्द वापरे होते.
याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सुद्धा निवडणूक आयोगाची भेट घेवुन सुजाता मंडल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या सुजाता मंडल
“अनुसूचित जातीतील लोक स्वभावाने भिकारी राहतात. ममता बनर्जी यांनी त्यांच्यासाठी खूप सार केल. मात्र फार थोड्या पैशासाठी ते भाजपला आपले मतदान विकत आहे”. असे वादग्रस्त विधान केले होते.
६ एप्रिल रोजी सुजाता मंडल यांच्यावर हमला झाला होता. त्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मास्क लावलेल्या काही जणांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. सुजाता मंडल डिसेंबर २०२० मध्ये भाजप मधून तृणमूल कॉंग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला होता.