Sunday, September 25, 2022
HomeUncategorizedदही, लस्सी, बटर पण महागले, GST 'गब्बर सिंग टॅक्स' वाटायलाय??

दही, लस्सी, बटर पण महागले, GST ‘गब्बर सिंग टॅक्स’ वाटायलाय??

दिवसेंदिवस महागाईचा आलेख चढताच पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने नवीन जीएसटी दर लागू केला आहे. विशेष म्हणजे, सरकारने पहिल्यांदाच अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिकच महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

सर्व गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर वाढवले ​असून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीडीटी) नवीन अधिसूचनेनुसार, याबाबतच्या शिफारसी 18 जुलैपासून लागू करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक पार पडली. त्यावेळी दुग्धजन्य पदार्थांना GST च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. दही, लस्सी आणि बटर 5 % जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य माणसांचा खिसा रिकामा करणारा आहे.

काय महागले आणि काय स्वस्त झाले

महाग झालेल्या गोष्टी

लेबल केलेले दही, लस्सी, पनीर, मध, तृणधान्ये, मांस आणि मासे यांच्यावरील जीएसटीत ५% वाढ.

रूग्णालयात ५ हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या खोलीवर ५% GST लागू करण्यात आला आहे.

चेकबुकद्वारे व्यवहार केल्यानंतर बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ %जीएसटी लागू होणार.

१ हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी.

छपाई/लेखन किंवा रेखांकन शाई, एलईडी दिवे, एलईडी दिवे अशा रोजच्या जीवनात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वस्तूंवरील जीएसटीत १२ टक्क्यांऐवजी १८ टक्क्यांवर वाढ.

पिठाची गिरणी, डाळ यंत्र ई. वस्तूंवरील जीएसटीत ५ वरून १८ टक्क्यांवर वाढ.

धान्य वर्गीकरण यंत्रे, डेअरी मशीन, फळ-कृषी उत्पादने वर्गीकरण यंत्रे, पाण्याचे पंप, सायकल पंप, सर्किट बोर्ड ई. वस्तूंवरील जीएसटीत १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी.

या वस्तू स्वस्त होणार

ओस्टोमी उपकरणे आणि रोपवेद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकाराला जाईल.

इंधनाच्या किमतीचा समावेश असेल अशा वाहतुकीवरील जीएसटीत कपात झाली आहे. १८ टक्क्यांऐवजी १२ जीएसटी लागू होईल.

दुध, फळभाज्या, मांस, मासे कड धान्ये, पेट्रोल-डीझेल गॅस यांच्या दरात दिवसेदिवस वाढ होत असतानाच जीवनावश्यक वस्तू जीएसटी कक्षेत येणे सामन्यांच्या मुळावर उठले आहे.

राहुल गांधी यांचे टीकास्त्र

नवीन जीएसटी दर लागू होताच विरोधकांनी यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागायला सुरु केले आहे. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी लगातार महागाई आणि जीएटीवरून सरकारला सवाल करत असतात.

मोदी सरकारने GST लागू केल्यापासूनच याविरोधात आवाज राहुल गांधीनी आवाज उठवला होता.GST हा गब्बर सिंग टॅक्स असल्याची टीका केली होती.

१८ तारखेच्या जीएसटी परिषदेनंतर वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मित्रां’चे न सांगणारे शब्द ऐकणाऱ्या पंतप्रधानांनाही आता जनतेचे म्हणणे ऐकून हा जीएसटी मागे घ्यावा लागणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

वाढत्या महागाईविरोधात संसद परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहुल गांधी म्हणाले,

महागाईने होरपळलेल्या जनतेवर जीएसटीचा बोजा टाकून संसदेत चर्चा न करून खर्‍या प्रश्नांकडे पाठ फिरवून चालणार नाही, पंतप्रधान. समोर या आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या.

GST की गब्बर सिंग टॅक्स

सामान्यांपासून आर्थिकदृष्ट्या गब्बर असलेले लोक देखील आर्थिक मंदीला तोंड देताना पाहायला मिळतेय. त्यातच दही, लस्सी आणि बटर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंना जीएसटी कक्षेत घेण्यात आल्याने GST म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे की काय ? हा सवाल खडा होत आहे.

‘वन नेशन वन टॅक्स’ असे म्हणत मोदी सरकारने GST चा अंमल सुरु केला. मात्र, जीवनावश्यक वस्तुंवरील वाढता टॅक्स हा चिंतेचा मुद्दा आहे.
आणखी वाचा :

मोदींच्या कार्यकाळात रुपयाची घसरगुंडी का झाली?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments