Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचागावगुंडांची दादागिरी, पहिल्याच बैठकीत सरपंचाला मारहाण

गावगुंडांची दादागिरी, पहिल्याच बैठकीत सरपंचाला मारहाण

मोहोळ (सोलापूर): ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला निघालेल्या सरपंचाला मारहाण केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे समोर आली आहे. ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा घ्यायची नाही. असे म्हणून तिथल्या काही गाव गुंडांनी सरपंचांना बेदम मारहाण केली आहे. सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांन विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची मासिक सर्वसाधरण सभा आयोजित केली जाते. या सभेला जात असताना कार्यालयाच्या दरवाज्यातच “तू मिटिंग ला जायचे नाही” असे म्हणून सरपंच वाल्मिकी यांना खाली खेचत गावगुंडांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाण थांबविण्यासाठी शिवराज निळे आले असता, त्यानाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा संपूर्ण घटना क्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याप्रकरणी राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम, सोमनाथ विरपे, बाळू कदम त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड २३ फेब्रुवारी ला पार पडली. यात सरपंचपदी वाल्मिकी जालिंदर निळे तसेच पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments