Sunday, September 25, 2022
HomeUncategorizedबाप - लेक घेताय एकाच वेळ घटस्फोट? जुग जुग जियो चित्रपटाचा ट्रेलर...

बाप – लेक घेताय एकाच वेळ घटस्फोट? जुग जुग जियो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…

वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या जुग जुग जिओ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जुग जुग जिओ हा एक फॅमिली ड्रामा आहे जो २४ जून २०२२ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची स्टोरी लग्न आणि नातेसंबंधांभोवती फिरते.

जुग जुग जिओमध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र कामं करताना दिसत आहेत. त्याच वेळी, नीतू कपूर दीर्घ काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे.

जुग जुग जिओ चित्रपटाची स्टोरी वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या कुटुंबाभोवती फिरते. जुग जुग जिओ हा एक फॅमिली ड्रामा असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय. अनिल कपूर आणि नीतू कपूर वरुण धवनच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत.

ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे लग्न करतात पण काही काळानंतर दोघे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. याबाबत वरुण धवन त्याच्या वडिलांशी बोलणार आहे. अनिल कपूर सांगतो की तोही त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. आता हे घटस्फोट होणार की नाही, हे 22 जूनला कळणार आहे.

प्राजकता कोळी आणि मनीष पॉल यांची भूमिका

युटूबर प्राजक्ता कोळी आणि होस्ट मनीष पॉलही जुग जुग जिओमध्ये दिसत आहेत. प्राजक्ता कोळी, जिथे तिने अनिल कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली आहे. त्याचबरोबर मनीष पॉल वरुण धवनच्या भावाच्या भूमिकेत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यात सातत्याने वाढ होत आहे. जुग जुग जिओ या चित्रपटाचे दिग्दर्शन गुड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता करत आहेत. त्याच वेळी, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम 18 द्वारे याची निर्मिती केली आहे.

हे पोस्टर शेअर करताना कियारा अडवाणीने लिहिले की,

जुग जुग जिओ चित्रपटाचे शूटिंग कोरोना काळत लॉकडाऊननंतर सुरू झाले. शूटिंगदरम्यान युनिटच्या अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनिल कपूर, नीतू कपूर आणि वरुण धवन यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लग्नानंतर सर्व काही बदलते.

आणखी वाचा :

शाहरुखची लेक सुहाना २२व्या वर्षी अभिनेत्री बनण्यासाठी सज्ज…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments