शेतकरी नेत्यांची अर्थसंकल्पावर टिका
गेल्या वर्षी करण्यात आलेल्या घोषणा बाबतची विचारणा
पुणे: अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा निराशाजनक असल्याची टिका केली आहे. शेतकऱ्यासाठी नवीन असे काही नसून गेल्या वर्षी करण्यात आलेल्या घोषणेचे काय झाले असाही प्रश्न यावेळी त्यांनी विचारला.
अर्थसंकल्प पाहून निराशा झाली आहे. गेल्या ६ महिन्यापासून लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा म्हणून नागरिक मागणी करत आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी स्वतः जाहीर केले होते की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत करू त्याचा काही सुतोवाच अर्थसंकल्पात झाला नाही.
२ लाख पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकरी जे अपात्र ठरले त्याबद्दल काहीही उल्लेख नाही. मग अर्थमंत्र्याने केले काय असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला. देवळ बांधून माणस उभ राहत नाही. आपल्याला माणूस उभा करायचा आहे. त्यासाठी जे करायला पाहिजे होत ते केल नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे पाहून निराशा झाल्याची टिका त्यांनी केली.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अर्थसंकल्पावर सडकून टिका केली होती. महाराष्ट्राचा की मुंबईचा बजेट आहे अशी टिका केली होती. अर्थसंकल्पा नवीन काही नसून सुरु असलेले प्रकल्प सांगण्यात आले आहेत.